तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

राज्यात काही महिन्यांपूर्वी १७ हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली (Police Recruitment 2024) होती. अखेर सरकारनं भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. (latest Job Update)

ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावं लागणार आहे. ३१ मार्च २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. यापूर्वी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार (Maharashtra Police) आहे. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे.

पोलीस भरती सुरू

नाशिक शहर पोलीस ( Nashik Police Recruitment) आयुक्तालयात रिक्त ११८, नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. राज्यात १७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. मुंबई पोलीसमध्ये (Mumbai Police Recruitment) पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती होत आहे. एकूण ३४८९ पदांसाठी ही भरती जाहीर होत आहे.

policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

error: Content is protected !!