पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी

राज्यात १४ हजार ९५६ पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.१ नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार ७४० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ०५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे.

error: Content is protected !!