(1) भारतीय संविधान 7 व्या अनुसुचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. (i) समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. (ii) राज्यसूची मध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही. (iii) घटस्फोट, मृत्युपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात.
(2) खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?
(3) भारत सरकार अधिनियम-1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत ? अ. संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता ब. केन्द्रातील द्विशासन क. द्विगृही केन्द्रीय कायदेमंडळ ड. केन्द्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी
(4) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(5) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
(6) आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ............ यांचे स्वातंत्र्य दिले आहे.
(7) राज्यघटनेच्या अनुच्छेद-51 मध्ये म्हटले आहे की, राज्य हे ............ यासाठी प्रयत्नशील राहील. अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे ब. शांततापूर्वक सहअस्तित्वास प्रोत्साहन देणे क. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे ड . आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटविण्यास प्रोत्साहन देणे
(8) भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते ?
(9) भारताच्या महालेखापालांना ............ यांच्या इतके वेतन मिळते.
(10) भारतीय राज्यघटनेच्या कलम 171(1) नुसार विधानपरिषदेची सदस्य संख्या किती असावी ? अ. विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा अधिक नसावी ब. 40 पेक्षा कमी नसावी क. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी ड. वरीलपैकी सर्व बरोबर
(11) कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल
(12) "भारतीय राज्यघटना ही संपूर्णत: संघराज्यात्मकही नाही आणि संपूर्णत: एकात्मही नाही, तर ती या दोघांचे मिश्रण आहे. ते एक वेगळ्या पद्धतीचे केन्द्रीत अथवा संयुक्त राज्य आहे. संघराज्यपद्धती असूनही राष्ट्राची आवड-निवड ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, या तत्वाची ती जपवणूक करते” असे निरीक्षण कोणी नोंदले आहे ?
(13) केन्द्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी .............. कडून घेतली आहे.
(14) राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. अ. फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी. ब. फक्त सशस्त्र बंड प्रसंगी. क. फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी. ड. फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्यानुसार. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(15) खालील विधाने विचारात घ्या : अ. न्या. फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ब. 1987 मध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्ये भारतीय संघराज्यातील अनुक्रमे 23, 24 व 25 वे राज्य म्हणून अस्तित्वात आली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
(16) खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्रि परिषदेचा आकार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के पेक्षा जास्त नसावा हे निश्चित करण्यात आले.
(17) "राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे "असे विधान कोणी केले आहे
(18) योग्य कथने ओळखा. अ) राज्यपाल 1/12 सदस्य विधान परिषदेत नियुक्त करू शकतात. ब) राज्यपाल राज्यविधिमंडळाचे अंग असतात.
(20) अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याचे सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते.
(21) खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आलेला आहे.
(22) भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा .....निर्माण झाली.
(23) राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालील प्रमाणे झाले होते.
(24) खालील कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटले-
(25) भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्म स्वतंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही.