पोलीस भरती गणित टेस्ट 1

पोलीस भरती गणित टेस्ट 1

Name
Phone
1.15 व्यक्तींनी 15 कि.मी अंतर चालण्यास 15 तास लागतात तर एका व्यक्तीला तेच अंतर चालण्यास किती वेळ लागेल ?

2.दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावि 23 आहे, तर त्या संख्यांचा लसावि किती ?

3. १ ते १० पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज काय ?

4. एका व्यक्तीकडे ठराविक रक्कम असते त्या पैशातून तो 50 संत्री किंवा 40 आंबे विकत घेऊ शकतो ती टॅक्सी भाड्याच्या 10% रक्कम ठेवतो आणि 20 आंबे खरेदी करतो त्याला शिल्लक रकमेतुन संत्री खरेदी करायची आहेत तो किती संत्री खरेदी करू शकतो ?

5.दिपकने बँकेकडून द. सा. द. शे. 16 दराने 8000 रु. 5 वर्षाच्या मुदतीने कर्ज घेतले. तर त्याला किती व्याज द्यावे लागेल ?

6.२/३, ४/७, ७/१२, ११/२१, .......?

7.एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ?

8.एक रक्कम A, B, C, D यांना अनुक्रमे 5:2:4:3 या प्रमाणात वाटप केली, जर C ला D पेक्षा 1000/- रुपये जास्त मिळाले तर B चा वाटा किती असेल ?

9.अक्षय शिंदे हे आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत. दिवस 1) मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो. दिवस 2) आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे. दिवस 3) मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो. अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात, त्याची निवड करा.

10.एका वर्गातील 30% विद्यार्थी इंग्रजीत व 35% विद्यार्थी गणितात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 25% असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती ?

11.एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

12. 14)²+(18)2 = (16)2 + (16)² + ......

13.दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती

14.10 माणसांच्या समुहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून, नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा दोन वर्षाने वाढते तर नवीन माणसाचे वय किती ?

15.एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

16. एक मोटार A बिंदु पासून 210 किमी अंतरावरील B बिंदुकडे 60 किमी प्रतितास या वेगाने सकाळी 09.30 वाजता निघाली तर ती B या मुक्कामावर कोणत्या वेळी पोहचेल ?

17. 94(6123) =?

18.1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस 17 ने पूर्ण भाग जाईल

19. 3,2, 7, 1, 0, 5, 6, 6, 4, 3, 6, 1, 7, 3, 3, 2 या अंकमालेतील डावीकडून सहाव्या अंकाचा वर्ग व उजवीकडून सातव्या अंकाचा वर्ग यातील फरक किती ?

20. प्रथम 7 मुळ संख्याची सरासरी किती ?

21.एक गाडी ताशी 40 km वेगाने A या गावाहून B या गावाकडे निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी गाडी ताशी 50 km वेगाने A या गावाकडे निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकींस भेटल्या तर A व B मधील अंतर किती ?

22. दोन संख्यांची सरासरी 5 आहे. त्यांचा भूमितीमध्ये 4 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?

23. एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल ?

24. रामने त्याचेकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती व्याज मिळेल ?

25. एका आयताची परिमिती ६४ सेमी आहे त्याची लांबी १७ सेमी असेल तर रुंदी किती असेल ?

error: Content is protected !!