आधुनिक भारताचा इतिहास

 

परकियांचे भारतात आगमन

 

* १४५३ – ऑटोमन तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपाल जिंकले व पूर्व पश्चिमेदरम्यानचा व्यापारी मार्ग तुर्वांनी नियंत्रणात आणला.

* यूरोपियांचा खुष्कीचा मार्ग बंद झाल्याने त्यांनी नवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली.

* १४९२ – भारताच्या शोधासाठी कोलंबस निघाला, परंतु त्याला अमेरिकेचा शोध लागला. (अमेरिका हे नाव अमेरिगो व्हेस्फुसीने दिले.)

* १४९८ पोर्तुगीज खलासी वास्को द गामा आफ्रिका खंडाला वळसा घालून कालिकत (केरळ) बंदरात पोहचला.

* पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन (१४९८) व भारत सोडणारे शेवटचे युरोपियन (१९६२) ठरले.

* पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर – फ्रांसिस डी अल्मोडा.

* इ.स. १६०० – ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (लंडन)

* इ.स. १६०८- इंग्रजांची भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन. (परवानगी – जहांगीर)

* इ.स. १६४० – मद्रास येथे इंग्रजांचा सेंट जॉर्ज किल्ला.

*युरोपियन भारतात येण्याचा क्रम – PDEF

पोर्तुगीज (P)डच (D)इंग्रज (E)फ्रेंच (F)

इंग्रज – मराठा युद्ध

 

* इंग्रज व मराठ्यांमध्ये तीन युद्धे झाली.

इंग्रज-मराठा युद्ध

 

कालखंड विजयी
पहिले 1775 – 1782 मराठे

 

दुसरे 1803 – 1805

 

इंग्रज (तैनाती फौजेचा स्वीकार)

 

तिसरे 1817 – 1818 इग्रज (मराठा साम्राज्याचा अस्त)

 

* तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.

* दुसरा बाजीराव पेशव्याला पेन्शन देऊन बिठूर येथे राहण्यास भाग पडले.

* इंग्रज म्हैसूर संघर्षात इंग्रजांची सरशी झाली.

* १७९९ साली श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतानचा मृत्यु झाला.

बंगालमधील लढाया

* बंगालच्या सुभेदाराने इंग्रजांना सुतानुती, कालिकत व गोविंदपूरची जमीनदारी दिली. (हे तिन्ही ठिकाणे म्हणजे आजचे कोलकाता)

* २३ जून १७५७ रोजी बंगालचा नबाब सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात लढाई झाली. त्यात मीर जाफर हा सेनापती तटस्थ राहिल्याने इंग्रज सहज विजयी झाले.

* प्लासीच्या लढाईत सेनापती मीर जाफरला नबाब पदाचे आमिष इंग्रजांनी दाखविले म्हणून तो तटस्थ राहिला.

* प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला नबाबपदी बसविले. त्याच्या जागी जावई मीर कासिमला नबाबपदी बसविले. इंग्रजांच्या सततच्या पैशाच्या मागणीतून बक्सारची लढाई झाली.

* २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मुघल बादशाह शाहआलम, मीर कासीम व अयोध्येचा नबाब शुजाउद्यौला यांच्या संयुक्त फौजेचा पराभव इंग्रज अधिकारी मेजर मन्रोच्या नेतृत्वातील फौजेने केला.

 

 

 

 

 

 

 

error: Content is protected !!